Arjun Khotkar on Kailash Gorantyal : जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर गोरंट्यल यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या महाशयांनी माझा गद्दार म्हणून उल्लेख केला होता. काँग्रेसने एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली? असा सवाल खोतकरांनी केलाय. नगरपालिकेची चौकशी लागल्यामुळेच भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा डाव असल्याचे खोतकर म्हणाले.
जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार, नेमकं काय म्हणाले कैलास गोरंट्याल?
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. पक्षप्रवेश करताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. आमचे मित्र संजय केनेकर किती दिवसांपासून माझ्या लागले होते की पक्षप्रवेश करा. त्यामुळे आज मी भाजपात प्रवेश करत आहे. मी तुम्हाला शब्द देतो की जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार. जी उरलेली काही वर्ष आहेत त्यात मी भाजपची सेवा करेन.
फक्त तिकीट देऊन काही होत नाही, जी रणनीती करायला पाहिजे होती
मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही रावसाहेब दानवे, अतुल सावे माझे मित्र होते. मी नवीन आमदार असताना मंत्रीपदात माझं नावं द्यायला पाहिजे होतं. रनींग आमदाराचे नाव तिसऱ्या यादीत होतं. फक्त तिकीट देऊन काही होत नाही, जी रणनीती करायला पाहिजे होती ती केली नाही. माझ्यासोबत जे आले ते इथे आहेत, जे आले नाहीत त्यांना आशिर्वाद आहेत. कुणाल पाटील, संग्राम जगताप माझे मित्र आहेत. तिकीट वाटपात चुक झाली, काँग्रेसच्या बंडखोराला मॅनेज करता आलं नाही. पार्टी वेगळी आहे, मी काय शिंदेगटात नाही भारतीय जनता पक्षात आहे. दानवे, लोणीकर, सावे माझे मित्र आहेत.