Dattatreya Bharane : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळणं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना चांगलच भोवलं आहे. माणिकराव कोकाटे यांचं खात बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane ) यांच्याकडे दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यावर दत्तात्रय भरणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीकर न मागता सगळं देतात, अशी प्रतिक्रिया भरणे यांनी कृषीमंत्रीपद देण्याच्या चर्चेवर दिली. 

Continues below advertisement


नेमकं काय म्हणाले दत्तात्रय भरणे?


कृषी खात्याबाबत अद्यापपर्यंत मला कोणतीही माहिती नाही. बारामतीकर न मागता सगळं देतात असं सूचक वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. मला कारखान्यात, जिल्हा परिषदेमध्ये, आमदारकी, मंत्री मंडळात न मागता संधी दिलेली आहे. त्यांच्यामुळं कोण काय करतं हे वरिष्ठांना सगळं माहित असतं असे मत दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. मला अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती आली नाही. ज्यावेळेस मला अधिकृत माहिती येईल त्यावेळेस मी तुमच्याशी बोलेल असे मत भरणे यांनी व्यक्त केले. 


 दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी


मंत्री दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू नेते मानले जातात. ते इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदा मंत्रिपद देण्यात आलं होतं.  महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं होतं. आता माणिकराव कोकाटे यांच्या विधानपरिषदेतील पत्ते खेळण्यामुळं आणि शेतकऱ्यांसदर्भातील वक्तव्यांमुळं त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेत दत्तात्रय भरणे यांना दिलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


 माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता 


अजित पवारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुणाला कृषीखाते देण्यात यावं आणि माणिकराव कोकाटे याना कोणतं खातं देण्यात याव याबाबतच पत्र देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे यांना कृषीखात तर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Dattatray Bharane :माणिकराव कोकाटेंमुळं महायुतीच्या अडचणी वाढल्या, कृषी खातं अजित पवारांच्या विश्वासू नेत्याला मिळणार, दत्तात्रय भरणेंवर मोठी जबाबदारी?