Nana Patole On Devendra Fadnavis Notice : दुसऱ्यावर कारवाई झाली की पेढे वाटायचे, अन स्वतःवर कारवाई व्हायची म्हणून आंदोलन करून सर्वसामान्यांना त्रास देण्याची ही भाजपची संस्कृती आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी भाजपवर केली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे राज्यभर नोटीसीची होळी करून आंदोलनं सुरू आहेत. यावर मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. नाना पटोले कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी गेवराईमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.


ज्या पद्धतीने केंद्रात बसल्यानंतर भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू केले. सीबीआय मागे लाऊन अनेक राज्यातील सरकारं पाडली, हे जनतेला माहीत आहे. दुसऱ्यावर कारवाई झाली की पेढे वाटायचे आणि स्वतःवर कारवाई होतेय म्हणून आंदोलन करून सर्वसामान्यांना त्रास द्यायचा, ही भाजपची संस्कृती आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.  


तुमच्या कारवाया बरोबर आणि आमच्या कारवाया चुकीच्या; धनंजय मुंडे यांचा भाजपला सवाल – 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी कारवाई ही सूडबुद्धीने होत असल्याचं भाजपकडून सांगितले जात आहे. दरम्यान यालाच आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत आमच्या कारवाया चुकीच्या आणि तुमच्या कारवाया बरोबर हे कसं? ज्या कारवाया होणार त्या होणारच, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. परळीत झालेल्या कार्यक्रमा दरम्यान धनंजय मुंडे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी भाजपवर त्यांनी निशाणा साधला.


राजकीय अभिनिवेशातूनच कारवाई, दबावात आणण्याचा प्रयत्न; आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रविवारी मुंबई पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी झाली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राजकीय अभिनिवेशातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जे आज प्रश्न आज विचारले ते आधीच्या प्रश्नापेक्षा वेगळे होते. ज्यामध्ये मी ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट चा उल्लंघन केले असा आरोप लावण्यात यावा अश्याप्रकारे प्रश्न विचारले गेले. नोटीस देऊन मला दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गृहमंत्री काहीही म्हटले तरी माझे प्रोव्हेलेज काय आहेत ते मला माहित आहे. सीबीआय या संदर्भात कारवाई करत आहे, जवाब नोंदविले जात आहेत. माझ्यावरील कारवाई राजकीय अभिनेवेशातूनच केली जात आहे.   वेळेत तुम्ही जर याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसते. आमचे कांड कोणी काढू नये, यासाठी दबाव आणला जातोय. ज्याचा लोकशाही वर विश्वास आहे त्यांना ही नोटीस चुकीची वाटेल.  आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ त्याचा तपास सीबीआय करेल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊत घाबरून पत्रकार परिषद घेतायेत, केंद्रीय तपास  यंत्रणावर आरोप करतात. मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. संजय राऊतवर जर अशी वेळ आली तर मला का बोलवलं , असा म्हणत का घाबरतात? असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.