परळी : मुख्यमंत्र्यांनी सर्वच वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना एकदम क्लीन चीट देवून अशा काम करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. राज्याचा कारभार सध्या 'इफ चीट यू, आय विल क्लीन यू ' असा सुरु असल्याचा, आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत केला. परळी-वैजनाथ बँकेच्या निवडणूकीसाठी आज मतदानासाठी ते आज आले होते.
तसेच यावरून अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्यचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना क्लीन चीट दिली. खडसेंना राजीनामा देण्यास सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदम त्यांच्यासह सर्वांनाच क्लीन चीट दिली, हे न कळण्यासारखे असल्याचा आरोपही मुंडे यांनी सरकारवर केला.