Amit Thackeray in Chhatrapati Sambhaji Nagar: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) आज (2 जुलै) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे हे रात्रीच शहरात दाखल झाले होते. यावेळी त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. दरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अमित ठाकरेंचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. तर आपल्या याच दौऱ्यात ते पक्षबांधणीच्या आढावा बैठका देखील घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या आजच्या संभाजीनगरच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


असा असणार दौरा... 


अमित ठाकरे हे रात्रीच शहरात दाखल झाले असून, रात्री त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी 10 वाजता ते जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या अंबेलोहळ ग्रामपंचायत अंतर्गत बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारण्यात जि.प.शाळेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. तर या कार्यक्रमात जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी हे अध्यक्षस्थानी राहतील. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत 12 वाजता तापडिया नाट्यमंदिर येथे पक्षबांधणीच्या आढावा बैठका, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मनसे प्रवेश सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.


स्वागताची जोरदार तयारी...


अमित ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असल्याने मनसेकडून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर पक्षबांधणीच्या आढावा बैठका, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मनसे प्रवेश सोहळा होणार असल्याने या परिसरात मोठ्याप्रमाणात होर्डिंग लावण्यात आले आहे. तर जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


निवडणुकीच्या अनुषंगाने दौऱ्याला महत्व...


आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नेतेमंडळीचे दौरे वाढले आहेत. दरम्यान यात मनसेची भर पडली आहे. अमित ठाकरे यांच्या दौरा देखील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा समजला जात आहे. तर पक्षबांधणीचं आढावा या दौऱ्यातून अमित ठाकरे घेणार आहे. तर पक्षातील कार्यकर्त्यांची अडचणी, जिल्ह्यातील पक्षाची स्थिती, पक्षातील बदल, स्थानिक मुद्द्यांवर होणारे राजकारण या सर्वांची चर्चा देखील या बैठकीत होण्याची शक्यता आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Raj Thackeray on Manipur Violence: काँग्रेसनं ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केलं म्हणणाऱ्या पीएम मोदींचे मणिपूर धुमसत असताना मौन का? राज ठाकरेंचा थेट सवाल