शिर्डी : शिर्डीत आज एका साईभक्तानं तब्बल 1 किलो 200 ग्रॅम वजनाचं सोन्याचं ताट साईंच्या चरणी अर्पण केलं.

या 1 किलो 200 ग्रॅम सोन्याच्या ताटाची किंमत तब्बल 35 लाखांच्या घरात आहे. मूळ छत्तीसगडमधल्या या साईभक्तानं नववर्षाच्या तोंडावर साईंच्या आरतीसाठी हे दान अर्पण केल्याची माहिती आहे.

नोटाबंदीच्या काळात नोटांचा ढिग

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाचा साईंच्या दानावर कोणताही परिणाम झालेला नाही. कारण नोटाबंदीनंतर म्हणजेच गेल्या 50 दिवसात साईचरणी तब्बल 31 कोटी 73 लाखांचं दान जमा झालं आहे.

या व्यतिरिक्त व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातून 3 कोटी 18 लाख रुपये दान म्हणून जमा झालं आहे. इतकंच नाही तर 2 किलो 900 ग्राम सोनेही साईंच्या चरणी वाहण्यात आलं आहे.