औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणासाठी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पंकजा मुंडे या मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचं काम पुढे नेत आहेत, असं म्हणत फडणवीसांनी पंकजा मुंडेंचं अभिनंदन केलं. तसेच जलयुक्त शिवार योजना बंद करु नये, जर या योजना पुढे नेल्या नाही तर मोठी लढाई लढू, असा इशाराही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे.
पाहा व्हिडीओ : जलयुक्त शिवार योजना बंद करू नका, अन्यथा मोठी लढाई लढू : देवेंद्र फडणवीस
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर सुरू आहे. या उपोषणासाठी भाजपचे दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी विरोध पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'मराठवाड्यात सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा अनुशेष आहे. सिंचनासाठी पाणी नसल्याने इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणूनच आमचं सरकार आल्यानंतर मराठवाड्यावर आम्ही विशेष लक्ष दिलं होतं. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. मात्र, यापूर्वीच्या आघाडी सरकारने मराठवाड्याला हिश्याचं पाणी दिलं नाही. त्यामुळं कृष्णा मराठवाडा योजनेचं पाणी मराठवाड्याला मिळालं नाही.'
दरम्यान, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे यांचं उपोषण होणार आहे. या उपोषणासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. या उपोषणासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली. दरम्यान हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष जावं म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. तसेच हे उपोषण सत्तेच्या विरोधात नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. संध्याकाळी उपोषणाचा समारोप करताना त्या कार्यकर्त्यांना संबेधणार आहेत.
संबंधित बातम्या :
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण