Devendra Fadnavis Vidhansabha Speech :  विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेल्या विजयावर आता शंका घेतली जात आहे, विरोधकांनी ईव्हीएमचा फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटही असते. आपण केलेले मतदान त्यावर दिसते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना काहीही अर्थ नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवारांनी या आधी कधीही ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला नव्हता, आता त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला याचे आश्चर्य वाटतंय असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र आणि त्यावर आता शंका घेणं म्हणजे संविधानिक संस्थांचा अनादर करणे असा होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभेत आम्हाला कमी जागा मिळाल्या, त्यावेळी आम्ही ईव्हीएमवर शंका घेतली नाही. पण विरोधक आता ईव्हीएमविषयी फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


पवार साहेबांकडून शंका व्यक्त झाल्याने आश्चर्य


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा निकाल आणि निकाल दुसऱ्या बाजून लागला तर ईव्हीएम दोषी असं विरोधकांचं सुरू आहे. हा लोकशाहीचा एक प्रकारे खून आहे. पवार साहेब यांनी कधीही ईव्हीएमचा मुद्दा काढला नाही. ⁠मात्र यावेळी त्यांनी मुद्दा काढला. ⁠ते म्हणाले की छोटे राज्य आम्हाला देतात आणि मोठे ते घेतात. पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही. पण यावेळी तेही बोललेत. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की ईव्हीएमवर बोलू नका. ज्या ठिकाणी तुम्ही हरता त्या ठिकाणी जाऊन लोकांना उसकवता.लोकशाहीत ही दादागिरी नाही खपवून घेतली जाणार नाही. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील मुद्दे


नवीन सरकार आल्यानंतर माझ पहिलंच भाषण आहे. मी राज्याच्या जनतेच आभार मानतो. या जनतेन महायुतीला घवघवीत यश दिलंय. दादांना अनेकजण पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, अजित दादा एकदिवस नक्की मुख्यमंत्री होतील. मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिलाय. मोदींच्या नाऱ्याला जनतेने साथ दिलीय. मागची पाच वर्षे मला टार्गेट करण्यात आल होतं, याचा एक रेकॉर्ड बनेल.  त्यावर समाज एक झालाय आणि महायुतीला मतदान केलंय. जवळपास 50 टक्के मतं महायुतीला मिळाली. 
 
मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्हूव भेदता येतो. त्यामुळे मी या जागेवर उभा आहे. याचं श्रेय मी भाजपाला आणि जनतेला देतोय. 


आम्ही दिलेलो आश्वासन आणि योजना बंद होणार नाही. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाईल. आम्ही सर्वांना दिलेली आश्वासन पूर्ण करणार.  


निवडणूक आयोगाने वारंवार सांगीतल तरी तुमच्या कानातच जात नाही. पुन्हा तुम्ही खोटी नेरेटिव्ह सुरु केलय, ते आम्ही मोडणार. ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. 2012 पर्यंत ईव्हीएम होतं. तर त्यानंतर व्हीव्हीपॅट सुरू झालं. आपण कुणाला मत केलंय हे त्यामध्ये दिसतंय. 


मी या आधी भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो. त्यामध्ये सामील झालेल्या काही संघटनांची काठमांडूमध्ये बैठक झाली होती. 15 नोव्हेंबर 2024 मध्ये ही बैठक झाली होती. 2012 चे कागदपत्रे मी घेऊन आलो आहे. त्यावेळी अर्बन नक्षलवाद जन्माला आला. देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग अशा सर्व यंत्रणांवर अविश्वास तयार केला जात आहे. त्यामुळे लोक बंड करतील म्हणजे संविधान तोडून अराजकता राज्य आणतील. हाच त्यामागे प्रयत्न आहे. काठमांडू बैठकीमध्ये भारत जोडोत सहभागी झालेले काही लोक गेले होते.  त्यामध्ये ईव्हीएम बद्दल चर्चा झाली. हे काठमांडूमध्ये ठरत आहे


त्यातील 40 संघटना अशा आहेत की त्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून जाहीर केलेले आहे. आर आर आबा त्यावेळी गृहमंत्री होते. बाळा नांदगावकर यांनी त्यावर भूमिका मांडली होती. त्याला आबांनी उत्तर दिले होते. त्यात अर्बल नक्षलवादी म्हणून ज्या संघटना घोषित केल्या होत्या त्याच या संघटना आहेत. ही यादी आमच्या काळातील नव्हे तर आर आर पाटील यांच्या काळातील आहे. 



ही बातमी वाचा :