Mathadi workers are aggressive against Minister Amit Shah : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ( Solapur Agricultural Produce Market Committee) माथाडी कामगारांनी (Mathadi workers) रात्रीपासून बंद पुकारला आहे. यामुळं शेकडो ट्रक कांदा (Onion) समितीमध्येच लिलाव न होता पडून आहे. दरम्यान, पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कामगरांमधील बैठक संपली आहे. बैठकीनंतर देखील माथाडी कामागर आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आजही सोलापुरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा संप सुरु आहे. आज माथाडी कामगारांनी अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि चपलांचा हार घालून निषेध केला.
शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार
दरम्यान, अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत असताना पोलिस आणि माथाडी कामागारांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. माथाडी कामगार काम करणार नसल्याने आज दिवसभरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत. मात्र, शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार आहे. या कांद्याचे लिलाव उद्या सकाळी नेहमीप्रमाणे पार पडणार आहेत. माथाडी कामगार आणि बाजार समिती प्रशासनमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर माहिती देण्यात आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल
काल मध्यरात्रीपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामागारानी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल असताना आज कांद्याचे लिलाव देखील होणार नाहीत. तर दुसरीकडे माथाडी कामगार वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करुन आपला संताप व्यक्त करत आहेत.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारख म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाहांनी म्हटलं आहे. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे शंभर वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या: