मुंबई : नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.


तीन दिवसांच्या दौऱ्यात भीषण परिस्थिती पाहिली. पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, तिथं माती आणावी लागेल. मराठवाड्यात काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 80 ते 90 टक्के पंचनामे झाले असे सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलेली नाही. आमच्या पाहणीत 70 ते 80 टक्के पंचनामे झालेले नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दौऱ्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.


'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक


विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मान्य करावे आणि ग्राह्य धरण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा विम्याचे क्लेम शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत. कर्जमाफी तर पोहचली नाहीच. पण, तगादा लावणाऱ्या नोटीस येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी SLBC ची बैठक बोलवून तात्काळ बँकांना कडक निर्देश दिले पाहिजेत. मागच्या काळात अतिवृष्टी, आवर्षण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळत होते. मी आकड्यात बोलणार नाही. कारण मुख्यमंत्र्यानेच 25 ते 50 हजार प्रति हेक्टरी मागणी केली होती. मदतीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला.


GST चे सर्व पैसे केंद्र सरकार राज्याला देतंय : फडणवीस 


GST चे सर्व पैसे केंद्र सरकार देतंय. राज्याची 60 हजार कोटींची अजूनही कर्ज काढण्याची पत आहे. राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो, जो केंद्राला पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन पाहणी करतं. महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून कांगावा केला जातोय. यापूर्वी शरद पवार कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्राला नेहमी मागितल्या पेक्षा कमी मदत मिळाली आहे. केंद्राने या काळात 27 हजार कोटी मागितले तेव्हा कुठे 3 हजार कोटी मिळाले. पण मोदी पंतप्रधान असताना राज्याला एकूण 25 हजार कोटींपैकी 11 हजार कोटी मिळाले, म्हणजे तिप्पट पैसे मिळाले. ज्यांनी 3 हजार रुपयांचे चेक वाटप केले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.


Eknath Khadse PC | देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे