Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सातत्याने उपोषण करत असतात. काही दिवसापूर्वीच त्यांनी मुंबईच्या आधाज मैदानावर मोठं आंदोलन केलं होते. यानंतर सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य देखील केल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एका कार्यक्रमात रॅपिड फायरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी इतकी उपोषण केली आहेत ती, त्यांना आता उपोषण वीर म्हणू शकतो. 

Continues below advertisement


मनोज जरांगे पाटलांचा गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यादरम्यान, त्यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. मात्र, आज एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी इतकी उपोषण केली आहेत ती, त्यांना आता उपोषण वीर म्हणू शकतो.


मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय


मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर त्यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. सरकारच्या या जीआर नंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, डोनाल्ड ट्रम्प, अजित पवार, अमित शाह, एकनाथ शिंदे, मनोज जरांगे यांच्याबद्दलचे प्रश्न रॅपिड फायरमध्ये विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांच राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांबद्दल दिलखुलासपणे उत्तरे दिली.


महत्वाच्या बातम्या:


मनोज जरांगे पाटलांचा आता 'चलो दिल्ली'चा नारा, देशभरातील सर्व मराठा बांधव एकत्र येणार