Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सतत संकट कोसळत आहे. नोव्हेंबर 2023 व 26 फेब्रुवारी 2024 या काळात सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं होतं. शासनाच्या आदेशात मदत देण्यासंबंधी प्रत्येक गावाचा समावेशही जाहीर झाला. मात्र, आजतागायत शेतकऱ्यांच्या हाती एक रुपयाची देखील मदत पोहोचलेली नाही. यामुळं येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. सततच्या आस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून 198  शेतकऱ्यांनी जलसमाधी घेणार असल्याचं निवेदन दिलं आहे. 

Continues below advertisement

शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला शासकीय मदत मिळतच नाही

शेतकऱ्यांवर स्पष्ट अन्याय होत आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेली अतिवृष्टी ढगफुटी मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शिवाय शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला शासकीय मदत मिळतच नाही. त्यामुळं शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. अशा या गंभीर परिस्थितीवर शासनाने तोडगा काढावा अन्यथा शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने 198 शेतकरी 9 ऑक्टोबर रोजी पळसखेड चक्का येथील खडकपूर्णा नदीत जलसमाधी घेतील. अशा प्रकारचे निवेदन आज सिंदखेड राजा उपविभागीय अधिकाऱ्यांना 198 शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या दिल आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 29 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे.  कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणात पाणी साठा,  विसर्ग याचा नियमित आढावा घेण्यात यावा.  संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने  आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..