Continues below advertisement


मुंबई : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. त्याचवेळी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देशही बँकाने दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे.


Marathwada Flood Update : दोन-तीन दिवसात पंचनामे पूर्ण करणार


विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.


CM Devendra Fadnavis On Flood : सर्व सवलती देऊ, मुख्यमंत्र्यांची घोषणा


राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत (मॅन्युअल) अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.


महाराष्ट्र दसऱ्याची तयारी करत असला तरी मराठवाडा मात्र महापुराच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. पावसाच्या थैमानामुळे मराठवाडा कोलमडून गेलाय. आता महापूर ओसरल्यानंतर दिसणारं नुकसानाचं दृश्य विदारक आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. दोन तीन दिवसांत पंचनामे करून दिवाळीआधी मदत देऊ, अशी घोषणा फडणवीसांनी केलीय. त्यामुळे महापुराच्या तडाख्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



यावेळी राज्यात 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करु असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसंच दोन हजार 215 कोटींच्या मदतीच्या वितरणास सुरुवात झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


ही बातमी वाचा: