धुळे : पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला असून स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक भ्रष्ट सरकार बघितलं नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीसांवर यांच्यावर केला आहे. तसेच गेल्या पाच वर्षात सरकारी कामात हजारो कोटींचे घोटाळे झाले. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामांत घोटाळा केला असल्याचा आरोपही गोटेंनी केला.

राज्यातील प्रत्येक गावात यांनी गोंधळ घातला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. देवेंद्र फडणवीस खरे असते तर आत्ता राज्यात उठाव झाला असता. ज्या अर्थी लोक शांत आहेत त्या अर्थी राज्यात लोकांच्या मनातील सरकार आलं असल्याचं अनिल गोटे म्हणाले. देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाही. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण हा फक्त गुंडाचा पक्ष राहिला असल्याची गंभीर टीका अनिल गोटे यांनी केली.

Anil Gote | फडणवीसांइतका लबाड माणूस जगाच्या पाठीवर सापडणार नाही : अनिल गोटे | ABP Majha



निवडणूक प्रकिया ही सुरुळीत पार पाडली. इथली महसूल आणि पोलीस यंत्रणा आजही भाजपकडे गहाळ टाकली आहे. सारासार विचार न करता अधिकारी असं का वागतात अस वागतात हे अनाकलनिय कोडं आहे. काल सांगवी मतदारसंघातील आमचा उमेदवार याने आर.सी पटेल या विद्यालयातील एक शिक्षकाला पैसे वाटताना पकडलं. आणि तो तक्रार करण्यासाठी गेला असता त्याच्यावरचं दरोड्याचा गुन्हा दाखल केला. ही गांभीर गोष्ट असून गृहखात जरी आमच्याकडे असलं तरी घरात घूसलेले चोर हे आधीचे आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या अनिल गोटे यांनी केली आहे.

तसेच धुळे जिल्हा परिषदेतच्या निकालानंतर आमच्या जागा वाढून, राष्ट्रवादी दोन अंकी जागा मिळवेल असा विश्वास गोटे यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल असेही गोटे म्हणाले.

Anil Gote | देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना अनिल गोटेंची जीभ घसरली | ABP Majha