Maharashtra Politics नागपूर: भाजप हरियाणामध्ये हरेल आणि त्यांच्यावर आम्ही हल्ला करू, अशा तयारीत शरद पवार (Sharad Pawar) उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस (Congress) होते. पण देशाचा मूड आता त्यांच्याही लक्षात आलेला असेल. त्यामुळे कधीकाळी "हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन?" असे म्हणायला लागले असल्याचे तुम्हाला पाहायला मिळत आहे. फेक नरेटीव संपलेला आहे, हे हरियाणाच्या निवडणुकीतून दिसून आलंय. आता लोक आता भाजपच्या पाठीशी आहे. अशी प्रतिक्रिया देत हरियाणा येथील निकालावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) हल्लाबोल केला आहे. ते नागपूर (Nagpur) येथे बोलत होते.


आठ नवीन मेडिकल कॉलेजचा शुभारंभ  


वित्तमंत्री असताना आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच हे विदर्भातील आहे. यात पाच कॉलेजची सुरुवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यात गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या मेडिकल सीटमध्ये मोठी वाढ होईल आणि त्याचा फायदा इथल्या स्थानिकांना होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला. मुख्यमंत्री असताना नागपूर विमानतळाचे टेंडर दिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. जवळ जवळ साडेचार वर्ष कोर्टातील प्रक्रियेनंतर आता त्याला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर आज या विकास कामाचे भूमिपूजन होत आहे. या विमानतळाचे विकासकार्य सप्नपूर्ती असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली.


माझ्यासाठी आजचा स्वप्नपूर्तीचा दिवस - देवेंद्र फडणवीस


आज माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. देशातील आधुनिक विमानतळ तयार होत आहे. कार्गोची सोय, नागपूर आणि महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारे एअरपोर्ट ठरणार आहे. तसेच शिर्डीला आता सुंदर एअरपोर्ट मिळणार आहे. सोबतच नागपुरात नाग नदीचे काम सुरू केलेले आहे. पोहरा नदीसाठी साडेसातशे कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचं आज भूमिपूजन होत आहे. एकट्या नागपुरात आज बारा ते तेरा हजार कोटीच्या विकासकामाचे भूमिपूजन होत आहे. अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


आमच्या सरकारच्या अडीच वर्षात 52 होस्टेल सुरू


जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटल आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल होईल. अशी माहिती ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची सुरुवात करू, अशी घोषणा केली होती. मात्र, अडीच वर्षात एकही हॉस्टेल तयार झाले नाही. आमच्या सरकारच्या प्रयत्नाने अडीच वर्षात 52 होस्टेल आज सुरू होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काचे स्थान मिळत आहे. ज्या ठिकाणी होस्टेल नाही तिथे विद्यार्थ्यांना भत्ता सुद्धा देणार आहोत. असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.


हे ही वाचा