नागपूर : महाराष्ट्राची बदनामी सचिन वाझे प्रकरणामुळे सर्वात जास्त झाली. वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की तो NIAला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नागपुरात बोलताना फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक का बरं  चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की तो एनआयएला काय सांगेल. त्यामुळे काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय कामे करून घेतली म्हणून आता शंका कुशंका काढत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला. 


फडणवीस म्हणाले की, हा रिपोर्ट नवाब मलिकांनी फोडला. माझा सवाल हा आहे की पोलिसांची बदनामी कुणी केली? सिंडिकेट राज कुणी चालवले? दलाली कुणी खाल्ली?  बदल्या कुणी केल्या, वाझेची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली की नाव केले? असा सवालही त्यांनी केला. 


भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का? रोहित पवारांचा सवाल


ते म्हणाले की, सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचे, त्यांना काय समजते? ते रोज काही ही बोलतात. आमचे राम कदम आहेत, ते त्यांना उत्तर देतील. मला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. 


रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या : जितेंद्र आव्हाड


फडणवीस म्हणाले की, पोलिसांचे सीसीटीव्ही कुणी गायब केले तरी बॅकअपमध्ये सर्व फुटेज सर्व्हरला आहेत. प्रायव्हेट फुटेज गयाब होऊ शकते, पण पोलिसांचे नाही, अशी व्यवस्था आहे.  त्याचे फुटेज मिरर इमेजिंग आहे. 2 ठिकाणी साठवले आहे.  डीव्हीआरची ही व्यवस्था मी गृहमंत्री असताना केली आहे.  डिजिटल फुटप्रिंट एक माणूस नष्ट करू शकत नाही, असं ते म्हणाले.


अहवाल कुणी बनवला? रंगला कगलीतुरा, फडणवीसांचा गंभीर आरोप तर आव्हाडांचं खोचक उत्तर


नागपूरच्या कोरोना परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की,  नागपूरची कोविड परस्थिती भयावह आहे. हॉस्पिटलला बेड्स उपलब्ध नाही,  प्रशासनाला अॅटिव्ह मोडमध्ये न्यावे लागेल. लोकांची व्यवस्था करावी लागेल, असं ते म्हणाले.