ABP C Voter Survey : सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला फायदा होणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यातल्या नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण कोणताही सर्व्हे असो फक्त मोदींचीच हवा असणार आहे, जनतेने ठरवलं आहे मोदींनाच निवडून द्यायचं. त्यामुळे आम्ही 40 च्या वरती जाणार म्हणजे जाणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर अशा प्रकारच्या सर्व्हेला कोणताही आधार नसतो, पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकालही आठवा अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
कोरोनावर प्रत्येकाने काळजी घ्यावी
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाच्या संदर्भात संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेऊन असून त्यावर योग्य त्या गोष्टी केल्या जातील असं फडणवीस म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये लोक ही शिकलेली आहेत. यामध्ये सर्वांनी त्रास सहन केला आहे. त्यामुळे किमान काळजी घ्यावी असंही ते म्हणाले.
काय सांगतो सी व्होटर सर्व्हे?
येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 जागा तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदेंनी भाजपला साथ दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. तरीही महाराष्ट्रात महायुतीसाठी चित्र फारसं आशादायक नसल्याचं चित्र आहे.
सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37 टक्के तर महाविकास आघाडीला 41 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्राचा ओपिनियन पोल - कोणाला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll ABP C voter survey Maharashtra)
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून जनमत चाचणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली असती तर पोलनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळाल्या असत्या. इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.
कोणाला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll ABP C voter survey Maharashtra)
स्रोत- सी व्होटर
- लोकसभेच्या जागा - 48
- भाजप+ 19-21
- काँग्रेस + 26-28
- इतर- 0-2
महाराष्ट्रात कोणाला किती मते? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll ABP C voter survey Maharashtra)
स्रोत- सी व्होटर
- लोकसभेच्या जागाा- 48
- भाजप+ 37 टक्के
- काँग्रेस + 41 टक्के
- इतर - 22 टक्के
ही बातमी वाचा: