मुंबई: सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घेण्याबाबत बुधवारी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रमनिहाय अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिवाय, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा सुधारित वेळापत्रक सुद्धा सीईटी सेल कडून संकेतस्थळावर जाहीर केलं आहे (http://mahacet.org ).
यामध्ये फार्मसी, अभियांत्रिकी (बीई, बीटेक), एमसीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एम ई, हॉटेल मॅनेजमेंट, एलएलबी यासरख्या अभ्यासक्रमच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी सुद्धा अनेक तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना येत असल्याने आठवड्याभराची मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, यामध्ये सुद्धा 22 ते 25 डिसेंबर दरम्यान अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदतवाढ संपत असल्याने आणखी काही दिवस मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता SEBC विद्यार्थ्यांना EWS मधून प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक
बीई (BE),बी टेक (B.Tech),बी फार्मसी ( B. Pharma)
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 30 डिसेंबर 2020
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 31 डिसेंबर 2020 पर्यत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 2 जानेवारी 2021
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 6 जानेवारी 2021
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 14 ते 16 जानेवारी 2021
एमबीए (MBA), एमएमएस (MSS)
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 29 डिसेंबर 2020 पर्यत
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 30 डिसेंबर 2020 पर्यत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 1 जानेवारी 2021
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 5 जानेवारी 2021
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 12 ते 14 जानेवारी 2021
एमसीए (MCA)
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 29 डिसेंबर 2020 पर्यत
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 30 डिसेंबर 2020 पर्यत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 1 जानेवारी 2021
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 5 जानेवारी 2021
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 11 ते 13 जानेवारी 2021
बी आर्किटेक्चर (B.Arch)
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 29 डिसेंबर 2020 पर्यत
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 30 डिसेंबर 2020 पर्यत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 31 डिसेंबर 2020
अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 4 जानेवारी 2021
प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 10 ते 12 जानेवारी 2021
एलएलबी 5 वर्ष, (LLB) एलएलबी 3 वर्ष, बी एड( B Ed)
अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 31 डिसेंबर 2020 पर्यत
बी पी एड, एम पी एड , एम एड प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 30 डिसेंबर 2020 पर्यत.
महत्वाच्या बातम्या: