MPSC : महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा (MPSC) राज्यसेवेच्या मुख्य अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतच्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Bombay High Court Aurangabad bench) दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पहिली सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने MPSC ला याबाबत नोटीस बजावली आहे.


एमपीएससीने (MPSC) ने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेत नवा अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, 2025 पासून नवा अभ्यासक्रम लागू करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी युवक कॉंग्रेससह स्पर्धा परीक्षार्थीनी पुण्यात आंदोलन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विनंतीनंतर आंदोलन माग घेण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 पासून करले असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. आता या निर्णयाला विरोध करत काही परीक्षार्थीनी न्यायालयात धाव घेतली आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश


एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरु केलं होतं. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने  घेतला होता. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले. हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाली होती.


न्यायालय याबाबत नेमका काय निर्णय घेणार ?


यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम यावर्षी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाचा फटका राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो. नवीन अभ्यासक्रम आम्हाला मान्य आहे परंतु तो यंदा लागू न करता 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. मात्र, आता हा अभ्यासक्रम 2023 पासूनच सुरु करावा अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे. हा विषय आता न्यायालयात गेला आहे. त्यामुळं आता न्यायालय याबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार, शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा