परिवहन मंत्री दिवाकर रावते भाजप अामदारांवर धावले
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 08:56 AM (IST)
मुंबई : विधानसभेत आज परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. भाजपा आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते त्यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मध्ये पडले आणि प्रकरण शांत केलं. भाजप आमदार आशिष देशमुख, विकास कुंभारे,सुधाकर देशमुख, रामचंद्र अवसरे हे वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत होते. त्यावेळी शिवसेनेचे दिवाकर रावते, रामचंद्र अवसरे भाजप आमदारांना भिडले.