Deepali Sayyad : शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली भोसले सय्यद यांनी मनसेला शिवसेनेसोबत येण्याची ऑफर दिली. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर सल्लाही दिला आहे. दिपाली भोसले सय्यद शुक्रवारी मिरा भाईंदरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे, केतकी चितळे या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं
अयोध्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हक्क आणि अधिकार आहे. भूमिका स्पष्ट नसलेले नेते स्वतःला हिंदू जननायक संबोधतात पण ते करुन दाखवू शकत नाहीत. राज ठाकरे ना खुल्लं आवाहन दिलं की, तुम्हाला भीती वाटत असेल तर आताही आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येला जा, जेणेकरुन तुमचा अयोध्या दौरा सक्सेस होईल. भाजपाचा स्लोगन घेवून तुम्ही अयोध्येला जात होतात. त्यामुळे आज नाही उद्या जाणार, उद्या नाही परवा जाणार आता तर जाणारच नाही, असा टोला दिपाली सय्यद यांनी लगावला आहे.
अयोध्येला आदित्यसोबत आम्हीही जाणार, आज आपण देव कुठे आणलाय देवाला रस्त्यावर आणलाय हे वाईट वाटतयं. तिन्ही पक्ष (भाजपा, मनसे आणि शिवसेना), अयोध्या आम्ही पाडली हे बोलणं चुकीचं आहे. बाकी काही विषय नाही का? बाळासाहेबांना कसं विसरु शकता. काही पक्ष हिंदु मुस्लिम, जातीचं राजकारण करत आहेत, असा टोलाही लगावला. संदिप देशपांडे यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मनसेचं राजकारण दोन तालुक्यापुरतं आहे. असं मिश्किल बोललं. तर मनसे तुम्ही आमच्या सोबत या नक्कीच तुमचा पक्ष वाडेल अशी ऑफरच दिपाली सय्यद यांनी यावेळी दिली.
ईडी आणि सीबीआयचा सासेमिरा आमच्या नेत्यांवर लावता. आता तुमच्या नेत्यावरही लावलं जाणार. ईडीची सासेमिरा लावण्याची सुरुवात भाजपाने केली. आता भाजपाने सुरुवात केलीय तर आम्ही शेवट करणार, आमच्याकडे ही तीर आहेत, असा खोचक टोला लगावला.
केतकी चितळे बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मला ही वाटतं.. महिला म्हणून, ती लहान आहे. बालिश बुध्दी आहे. पण असं असताना ती जिम्मेदार व्यक्ती आहे. सोशल मिडियाचा वापर कसं केला पाहिजे हे तिला माहिती पाहिजे. आज केतकीला माफ केलं तर उद्या आणखीन अशा गोष्टी करतील. तिला शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर माफ करावं.