मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. या संदर्भात आज शिक्षण विभागाची महत्वाची बैठक पार पडली. 


शिक्षण विभागाच्या बैठकीत आज विविध विषयांवर चर्चा झाली आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सरसकट पास करायचं की वर्षभरातल्या मूल्यमापनावर याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दहावी आणि बारावी परीक्षांबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसात याबाबत शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर स्वीकारणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुविधा


बोर्डाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालक संभ्रमावस्थेत आहेत.


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं : राज ठाकरे


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे.  शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा. 


पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी परीक्षेविना पास, पुढील वर्गात प्रवेश मिळणार


कोरोना काळात खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षभरात बंद होत्या. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, मात्र काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण झाला नाही. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.