मुंबई : रस्त्यांमधील खड्डे हा मुंबईसकट संपूर्ण देशभरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी आपल्या चिंतेत भर घालणारी आहे.


 
गेल्या वर्षभरात राज्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात 700 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या वाहतूक आणि संशोधन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

 
देशभरात गेल्या वर्षात खड्ड्यांमुळे तब्बल 10 हजार 727 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर उपाय काढण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

 
यापुढे रस्त्यातील खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास रस्ते बनवणाऱ्या यंत्रणा आणि वाहतूक पोलिस यांना जबाबदार धरण्यात येईल. खड्डे दुरुस्त करण्याच्या कामात अधिकाऱ्यांकडून कुचराई झाल्यास हा गुन्हा म्हणून नोंदवण्यात येणार आहे.