Devendra Fadanvis ABP Network Ideas Of India Live : यापुढे उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाईल, असं वाटत नाही. आम्ही मनाने वेगळे झालोय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेय. ते एबीपी माझाच्या 'आयडिया ऑफ इंडिया' कार्यक्रमात बोलत होते.  एबीपी नेटवर्कची वार्षिक शिखर परिषद 'आयडिया ऑफ इंडिया'ला (Ideas Of India) आजपासून सुरुवात झाली. 23 आणि 24 फेब्रुवारी अशा दोन दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध वक्ते आपली मतं व्यक्त करतात. आज देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केले.


उद्धव ठाकरे मित्र होते, आज नाहीत का ? 


उद्धव ठाकरे मित्र होते..आज नाहीत का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, मित्र कोणाला म्हणतात?  हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. मी त्यांनी 5 वर्ष केलेला प्रत्येक कॉल उचलला. मी त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम केले, पण मी त्यांना फोन करत राहिलो. पण त्यांनी एकदाही कॉल घेतला नाही.  आपली युती होऊ शकणार नाही, असे सांगायचं तर होतं. जर आम्ही मित्र होतो तर उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला पाहिजे होता.  उद्धव ठाकरेंनी दरवाजा आणि रस्ता बंद केला होता. त्यानंतर आमचे कधी बोलणे झाले नाही. उद्धव ठाकरे मित्र होते. मला वाटतं नाही आम्ही आता उद्धव ठाकरेंसोबत जाऊ. आम्ही मनाने वेगळे झालोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


मोदी यांना उठल्यापासून शिव्या नाही घातल्या तर त्यांना जेवण जात नसेल. त्यांचे काही लोक सकाळी उठल्यापासून सुरू होतात. राजकारणात काही इश्यू होत असतात. 25 वर्ष ज्यांच्यासोबत आम्ही सुखदुःख वाटले असे लोक आमच्या नेत्याबाबत बोलतात तेव्हा हृदय तुटतं, असेही फडणवीस म्हणाले. 


शिंदेंसोबत इमोशनल आघाडी - 


अजित पवार यांच्यासाठी आघाडी ही एक  रणनिती आहे. शिंदेंसोबतची आघाडी ही आमची इमोशनल आघाडी आहे. प्रत्येक सरकारची कामाची एक वेगळी पद्धत असते. मी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. मुख्यमंत्री असताना मी जो अजेंडा चालवत होतो तो आताही उपमुख्यमंत्री असताना चालवत आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये माझा तेवढाच सहभाग आहे, असे फडणवीस म्हणाले. 


शरद पवार यांनी माघार का घेतली


युतीसाठी शरद पवार बोलले अजित पवार यांना तयार केले आहे. पण माहीत नाही शरद पवार यांनी माघार का घेतली? अजित पवार यांना आधी पुढे केले, मग शरद पवार मागे हटले. म्हणून अजित पवार आज आमच्यासोबत आले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली ? 


एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे आधीपासूनच चांगले संबंध आहेत. आम्ही एका प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. ज्यावेळी मविआ सरकार बनले त्यावेळी एकनाथ शिंदे यांना वाटलं हे योग्य नाही. विचारांशी तडजोड करणे त्यांना जमत नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या वागण्याने लोक वैतागले, म्हणून त्यांच्यासोबतच्या लोकांनी निर्णय घेतला आणि आमच्या सोबत आले, असे फडणवीस म्हणाले.