Pune Ajit Pawar शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोदी आणि शहांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. 


पुढे बोलताना ते म्हणाले की, अमित शहा हे गुजरातचे आहेत, पण त्याचं महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे. अजित पवारांनी असं म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर त्यांनी प्रेम असल्याचं कारण सांगितलं. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असतं. हे अमित शहांच्या रूपाने ही पाहायला मिळतं. महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होतं. दोन्ही राज्यात ही सहकारातून क्रांती झालेली आहे.


अमित शाहांनी डेरिंग केलं म्हणूनच... : अजित पवार


केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित शहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, असंही ते म्हणाले. 


 ....म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय : अजित पवार


अजित पवारांनी असं का केलं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण हेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ajit Pawar : मंत्रिमंडळातील फिट मंत्री कोण? अजित पवारांनी थेट नावच सांगून टाकलं...