शिर्डी : शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर (Saibaba Mandir) हे आज साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दसरा (Dasara) आणि पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यत आला आहे.
शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आज पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने देश- विदेशातील लाखो भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने शिर्डी नगरी फुलून गेली आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना दर्शन सुकर व्हावे यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला आहे.
दसरा सण आणि पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून साई नामाचा जयघोष करत भाविक प्रसन्न वातावरणात साईबाबांचे दर्शन घेत आहेत. पुण्यतिथी उत्सवाला 104 वर्षांची परंपरा असून आज भिक्षा झोळी, आराधना विधी यासह सायंकाळी पाच वाजता ज्या खंडोबा मंदिरात साईबाबा प्रथम नजरेस पडले तिथे सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिरासह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर दर्शन रांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात आज चार दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने साई चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी शिर्डीत गर्दी केली आहे. 103 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी द्वारकामाईत साईबाबांनी आपला देह ठेवला होता त्या द्वारकामाई परिसरात देखील भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. साई मंदिराला आज आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा..' हिंदू संस्कृतीत (Hindu Religion) खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा (Dasara 2022) हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आज 5 ऑक्टोबर या दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते.
संबंधित बातम्या :