Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिला आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) काल मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला होता. मात्र, पावसानं दांडी मारली आहे. सध्या परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितेल आहे. दरम्यान, आजही राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, आमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपासून (5 ऑक्टोबर) परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.  5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं  दिली आहे. त्यामुळं सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, आज हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्यात पावासाचा अंदाज वर्तवला आहे.


राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचे देखील नुकसान झालं आहे. ददरम्यान, राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळं नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon News : धक्कादायक! गावाला तिन्ही बाजूनं पाण्याचा वेढा, शाळेत जायला रस्ताच नाही, गेल्या दोन महिन्यापासून 80 विद्यार्थी घरीच