Maharashtra Dam Water Storage: राज्यात तापमानाचा भडका उडालेला असताना आता पाणीटंचाईचा सावट ही मान उंचावून उभे आहे . राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये आता केवळ 34.77% पाणी शिल्लक आहे .गेल्यावर्षी याच सुमारास राज्यातील धरणे 30.65% एवढी भरली होती . यंदा पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणी साठा शिल्लक असून 30 टक्क्यांहूनही कमी पाणी धरणांमध्ये राहिले आहे .अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धरणांची पाणी पातळी सर्वात कमी झालेली असते .जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे . मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात पाणीटंचाईला आता सुरुवात झाली आहे . कोणत्या विभागात सध्या धरणसाठ्याची काय स्थिती आहे? पाहूया .
कोणत्या विभागात किती पाणी साठा ?
सध्या महाराष्ट्रातील लघु मध्यम व मोठ्या अशा एकूण 2997 धरणांमध्ये 34.77% जलसाठा शिल्लक राहिलाय .पुणे विभागातील 720 धरणांमध्ये आता केवळ 28.32% पाणी शिल्लक आहे .मराठवाड्यात 34.48% तर नागपूर विभागात 36.61% जलसाठा राहिला आहे .अमरावती भागात 45.25% पाणी शिल्लक असून नाशिक नगरच्या पट्ट्यात एकूण 38.95% पाणी शिल्लक राहिले .कोकण विभागातील धरणांमध्ये 42.20% पाणी आता राहिले आहे .
पुणे विभागातील धरणसाठा घसरतोय ..
पुणे विभागातील एकूण धरणांमध्ये आता 26.67% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे .यात सोलापूरच्या उजनी धरणाचा पाणीसाठा मायनस कडे जात आहे .पुण्यातील खडकवासला धरणात आज 45.29% पाणी साठा राहिला असून पानशेत धरण 28.70 टक्क्यांनी भरले आहे .सांगलीतील वारणा धरण आता 35.34 टक्क्यांवर आहे .साताऱ्यातील कोयना धरणात 29.77% ज्वल साठा राहिला असून कोल्हापूरच्या दूधगंगा मध्ये 21.49 टक्के पाणी शिल्लक आहे .राधानगरी धरण 49.30% भरलं .
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण 40.47 टक्क्यांनी भरले आहे तर गंगापूर 53 टक्क्यांवर आहे .अहिल्यानगर मधील भंडारदरा धरण 56.28% असून निळवंडे धरणात 22.84% पाणीसाठा शिल्लक आहे .
मराठवाड्यात कुठलं धरण किती भरलंय?
मराठवाड्यात आता पाण्याची चणचण जाणवू लागली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाण्याचे टँकर मागवले जात आहेत .पैठणच्या जायकवाडी धरणात 875 दलघमी एवढा पाणीसाठा राहिला असून बीडचे माजलगाव धरण 15.16 टक्क्यांवर आले आहे .मांजरा धरणात 28% पाणीसाठा आहे .हिंगोलीतील सिद्धेश्वर आणि येलदरी 54 आणि 56 टक्क्यांवर आहेत .नांदेडचे विष्णुपुरी धरण सध्या 28.27 टक्क्यांनी भरले आहे .गेल्या वर्षी विष्णुपुरीत 31.87% पाणीसाठा होता .धाराशिवला प्रामुख्याने उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो .मात्र उजनी धरण आता मायनसमध्ये गेले आहे .सीना कोळेगाव धरणाचा पाणीसाठा ही शून्यावर आलाय .परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरण 34.16 टक्क्यांनी भरले आहे .
हेही वाचा: