Wardha: विधान परिषदेचे माजी आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक रामदास आंबटकर यांचे आज (मंगळवार) दुपारी चेन्नई येथील रुग्णालयात निधन झाले. श्वसनासंबधी त्रास जाणवू लागल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने चेन्नईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


रामदास आंबटकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी संघात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. संघाच्या कामातूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विधान परिषदेवर निवडून येत आमदार म्हणून कार्य केले.त्यांच्या निधनाबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली आहे. त्यांच्या जाण्याने संघ परिवारासह भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, मंत्री नितिन गडकरी यांनी आंबटकर यांच्या जाण्याने अतिव दु:ख झाल्याची प्रतिक्रीया दिलीय. त्यांनी X माध्यमावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रामदास आंबटकरांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


 






राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून राजकारणाला सुरुवात


सुरुवातीला त्यांना श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागल्याने नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. रामदास भगवान आंबटकर यांचा जन्म 1 जुलै 1960 रोजी वर्धा जिल्ह्यातील वडनेर या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांनी सलग तीन वेळा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि संपूर्ण आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची शिकवण रुजवली. लहानपणापासून वडिलांपासून मिळालेल्या प्रेरणेतून डॉ. रामदास आंबटकर यांनी राष्ट्र उभारणीसाठी आणि लोकसेवेसाठी स्वतःचे जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. शालेय जीवनात असतानाच, 1965 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि तेव्हापासून त्यांनी संघाचे कार्य सातत्याने आणि निष्ठेने केले.


हेही वाचा:


Pune Crime News: मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ अन्... सिनिअर्सकडून रॅगिंग, ससूनच्या डीन एकनाथ पवारांनी दिली माहिती; म्हणाले, 'विद्यार्थ्याच्या आईने...'