सध्या नाशिकमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. पाण्याचा जोर वाढल्यानं या बंधाऱ्याच्या उजव्या बाजूला असलेला मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे गोदावरीचं पाणी परिसातील शेतीत घुसल्यानं मोठं नुकसान झालं आहे. तसेच हा भराव वाहून नदीपलीकडच्या गावात ये-जा करण्यांचाही मार्ग बंद झाला आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वीही अशाच प्रकार हा बंधारा वाहून गेला होता. त्यामुळे आता येथे माती न टाकता सिमेंट बांधकाम करण्याची मागणी नागरिकांककडून केली जात आहे.
पाहा व्हिडीओ :