Cyclone Gulab LIVE Updates : जाणून घ्या 'गुलाब' चक्रीवादळासंबंधी प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Cyclone Gulab LIVE Updates : आंध्र-ओडिशाला धडकणाऱ्या गुलाब चक्रीवादळाची आणि त्याचा महाराष्ट्रावर होणाऱ्या परिणामांची प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळेल.
गुलाब चक्रीवादळ दक्षिण उडीशा - उत्तर आंध्र प्रदेशदरम्यानच्या कलिंगपट्टण ते गोपाळपूरच्या भागात आज धडकण्याची शक्यता, लॅंडफॉल दरम्यान 95 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
गुलाब चक्रीवादळ दक्षिण उडीशा - उत्तर आंध्र प्रदेशदरम्यानच्या कलिंगपट्टण ते गोपाळपूरच्या भागात आज धडकण्याची शक्यता, लॅंडफॉल दरम्यान 95 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
पार्श्वभूमी
Cyclone Gulab : आंध्र-ओडिशाच्या किनारपट्टीला 'गुलाब' चक्रीवादळ धडकणार; रेड अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आज संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकणार आहे. हे चक्रीवादळ 95 किमी तासी वेगाने किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या दोन राज्यातील किनारपट्टी क्षेत्रावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचे 'गुलाब' नाव हे पाकिस्तानने सुचवलं आहे. विशाखापट्टनम आणि गोपालपूर या दरम्यान असलेल्या कलिंगपट्टनम या ठिकाणी संध्याकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
भारतीय हवामान खात्याने या संबंधी रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या आणि आंध्रच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पूराची शक्यता असल्याचं तसेच इतर प्रकराच्या नुकसानीचाही इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबरपर्यंत बंगाल, ओडिशा, मध्य आणि उत्तर भारतातल्या काही ठिकाणी लहान-लहान चक्रीवादळांची निर्मिती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचसोबत विदर्भ, तेलंगणा, मराठवाडा कोकण, मुंबई आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी 29 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राला याचा फटका बसणार नसला तरी प्रभाव मात्र नक्कीच
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात या चक्रीवादळाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होणार आहे अशातच महाराष्ट्राला याचा फटका बसणार नसला तरी प्रभाव मात्र नक्कीच जाणवणार आहे.
बंगालच्या उपसागरात 2021 मध्ये निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात 2021 मध्ये निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ असेल. ह्याआधी तौक्ते, यास चक्रीवादळं आली होती. दरम्यान, 2011 ते 2021 सालात सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारं हे तिसरं चक्रीवादळ आहे. तर 1990 ते 2021 सालात सप्टेंबर महिन्यात 14 चक्रीवादळं निर्माण झाली आहेत आणि हे गुलाब 15 वे चक्रीवादळ असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -