पुणे : स्पाईसजेटच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल 9.1 किलो सोनं सापडलं आहे. या सोन्याची किंमत 2.8 कोटींच्या घरात आहे.
स्पाईसजेटच्या दुबई-पुणे विमानात आज पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घटली. टॉयलेटमध्ये एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये हे सोनं गुंडाळलेले होतं.
पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. विमानतळावरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी ही कारवाई असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.