बीड : मराठा जातीचा दाखला खरंच मिळणार? जातीच्या पुराव्यांद्वारे दाखला मिळणार? सेतू कार्यालयात खरंच दाखला मिळतो? मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. मराठा दाखल मिळवण्यासाठी काय काय करायचं? याची जंत्रीच त्यात दिली आहे. शाळेचा दाखला घ्या, बोनाफाईड सर्टिफिकेट घ्या, घरातल्या व्यक्तींचा दाखला मिळवा, रहिवासी प्रमाणपत्र काढा, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स... हे जमवा आणि ते जमवा... पण हा सगळा खटाटोप करुन खरंच असा मराठा असल्याचा दाखला मिळतोय का?
अनेक जण हा दाखला वाचून सेतू कार्यालयांवर धडका मारत आहेत. त्यामुळे या मेसेजच्या आधारावर एबीपी माझा जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलं आणि वास्तव समोर आलं.
आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी अनेक मुलं सेतू केंद्रावर विचारणा करत आहेत, मात्र सेतू केंद्रावर याची कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही. तर 2014 मध्ये सरकारच्या पोर्टलवर मराठा आरक्षणासाठीचा जो फोरमॅट होता, तो अजूनही बदललेला नाही. त्यामुळे सेतू सुविधा केंद्र चालक आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी लागणारी माहिती भरु शकत नाहीत.
सरकाराने मेगाभरतीची घोषणा केल्यानंतर अनेक मुलं आरक्षणाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी घाई करत आहेत. मात्र त्याची माहिती कुठच उपलब्ध होत नाही. तशा माहितीचं परिपत्रक सेतू केंद्र किवा तहसील कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. प्रमाणपत्रासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स मुलांकडे आहेत, मात्र माहिती कुठे भरायची हे अजून समजलेलं नाही.
2014 मध्ये मिळालेल्या आरक्षणाचा फायदा मराठा समाजतील काही मुलांना झाला. मात्र त्यावेळीही बहुसंख्य मुलांकडे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना याचा फायदा घेता आला नाही. तर आता आरक्षण मिळूनही त्यावर त्वरित अंमलबजावणी होत नसल्याने अनेक मुलं निराश झाली आहेत.
नुकतीच मेगाभरती होणार असल्याची घोषणा झाली असताना, मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जातीचा प्रमाणपत्र मात्र अद्याप उपलब्ध नाहीत. सरकार स्तरावर मिळणाऱ्या या आदेशाची सध्या ही कार्यालयं वाट पाहत आहेत. त्यामुळे आता आरक्षण जाहीर झालं खरं मात्र ते जातीचं प्रमाणपत्र या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्नच आहे.
रिॲलिटी चेक : सेतू कार्यालयात खरंच मराठा जातीचा दाखला मिळतो?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2018 03:05 PM (IST)
अनेक जण हा दाखला वाचून सेतू कार्यालयांवर धडका मारत आहेत. त्यामुळे या मेसेजच्या आधारावर एबीपी माझा जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलं आणि वास्तव समोर आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -