Crop Insurance Deadline : राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढता यावा म्हणून, राज्य सरकराने 1 रुपयांत विमा काढण्याची योजना आणली आहे. दरम्यान, 31 जुलै पर्यंत पीक विमा काढण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही शेतकरी यापासून वंचित राहिल्याने तीन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर, आज पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरत आहे. तर, सरकारच्या निर्णयानंतर कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्तीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतोय. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही होती, ती आता केंद्र शासनाने 03 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात 01 ऑगस्ट अखेर 5 लाख 5 हजार 494 शेतकरी यांनी 3 लाख 20 हजार 82 क्षेत्रावर विमा उतरविला आहे. तालुका निहाय शेतकरी संख्या पाहता औंढा नागनाथ 99 हजार 971, वसमत 1 लाख 14 हजार 469, हिंगोली-91 हजार 071, कळमनुरी-86 हजार 823 आणि सेनगांव 1 लाख 13 हजार 160 या प्रमाणे विमा उतरविला आहे. विमा भरण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट असून राहिलेल्या शेतकऱ्यांनी सामुहिक सुविधा केंद्र (CSC सेंटर) द्वारे 01 रुपयात विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
नुकसान झाल्यास विमा कंपनीशी साधा संपर्क...
तसेच मागील काही दिवसात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे अथवा मार्गदर्शक सुचनेतील अन्य कारणामुळे ज्या विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी निवड करण्यात आलेली विमा कंपनी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्याकडे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्वरीत इंटिमेशन सादर करायचे आहे. त्यासाठी पत्ता:डी-301 तीसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग,भांडुप (पश्चिम), मुंबई-400078 असा असून संपर्कासाठी टोल फ्री क्र. 18002660700 व ई-मेल-pmfby.maharashtra.@hdfcergo.com असा आहे. सदरील विमा कंपनीने जिल्ह्यामध्ये कार्यालय देखील स्थापन केले आहे. त्यांच्या कंपनी प्रतिनिधींची माहिती खालील प्रमाणे आहे.
हिंगोली (जिल्हा) यासाठी दिपक बेतिवार (मो. 9911114171) व संतोष सरकटे (मो.7875651137), हिंगोली (तालुका)-श्रीधर बोरकर (मो.8390208459), सेनगाव- संतोष तायडे (8975770177) व संतोष भाकरे (7709670967), वसमत- सगीर नाईक (8329169286) व जाहिद हुसेन (8087889331), औंढा नागनाथ- पवन गायकवाड (8308889773) व रत्नदीप भालेराव (8483802619), कळमनुरी- संतोष बकरे (9158688422) व रवी वाघमारे (9860872329) याप्रमाणे कंपनी प्रतिनिधी आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: