धुळे : कुख्यात गुंड गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख याच्या हत्येप्रकरणी सहा मुख्य आरोपींपैकी भीमा देवरेसह एकूण तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गणेश पिवल आणि योगेश जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.


भीमा देवरे आणि योगेश जगताप यांना दोंडाईचा परिसरातून, तर गणेश पिवलला मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली होती.

कुख्यात गुंड गुड्ड्याची गेल्या मंगळवारी भर चौकात टोळी युद्धातून हत्या करण्यात आली  होती. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी गोयर आणि देवरे गटातील 11 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच गुड्ड्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी पहाटे त्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली.

दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तींना १० ते ५० हजारापर्यंतचे बक्षीस धुळे पोलिसांनी जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या:

कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, दुसरा संशयित आरोपी अटकेत

कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, एका संशयिताला अटक

धुळ्यात कुख्यात गुंडाचा गोळ्या झाडून खून