चंद्रपूर : शहराच्या विविध भागातून चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी फरार झाला आहे. दुचाकी चोरीच्या स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजद्वारे या दोघांची ओळख पटवून, ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, हे बाईकचोर मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
गेल्या काही महिन्यापासून चंद्रपूर शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या तक्रारीत वाढ झाली होती. मात्र चोर पकडण्यात पोलिसांना अपयश येत होतं. अठवड्याभरापूर्वी शहरातील जटपुरा गेट भागातून एका घरा समोरुन दुचाकी चोरी झाली.
यानंतर पोलिसांनी या भागातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये रात्रीच्या अंधारात तीन बाईकचोर बिनधास्तपणे दुचाकी चोरुन नेत असल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी आपल्याकडील नोंदी तपासून आपल्या खबरींकडून या दुचाकीचोरांची ओळख पटविली.
यात भारत मलिक आणि शेख नजीम या दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी फरार आहे. यावेळी आरोपींकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीच्या शोध सुरु आहे. पोलीस तपासात हे बाईकचोर मौजमजेसाठी बाईक चोरत असल्याचं समोर आलं आहे.
बाईकचोरांची हुशारी सीसीटीव्हीत कैद, दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2017 11:34 AM (IST)
शहराच्या विविध भागातून चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी फरार झाला आहे. दुचाकी चोरीच्या स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजद्वारे या दोघांची ओळख पटवून, ही कारवाई करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -