एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017


1.    मुंबईतील घाटकोपरमध्ये रहिवासी इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश https://goo.gl/3BJYRk

2.    घाटकोपरमीधल इमारत धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने दिली नाही, महापौर महाडेश्वरांची माहिती, तर साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती, आव्हाडांच्या आरोपावर गृहनिर्माण मंत्र्यांचं उत्तर https://goo.gl/fDKw1D

3.    शिवसेनेच्या सुनील शितपच्या कारनाम्यांमुळे इमारत कोसळली, स्थानिकांचा गंभीर आरोप, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचंही शिवसेनेकडे बोट, राजकारण तापण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in/live-tv

4.    शिवसेनेने आघाडीसोबत यावं, तातडीने कर्जमाफी करु, अजित पवारांच्या मिश्कील टोल्यांनी विधीमंडळात हास्यकल्लोळ, मुंबई महापालिकेने 30 हजार कोटी देण्याची मागणी https://goo.gl/f9Woue

5.    साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांना अटक आणि अंतरिम जामीन, मारहाण आणि खंडणीप्रकरणी कारवाई https://goo.gl/dvqbFG

6.    भारत म्हणजे विविधतेतून एकतेचं दर्शन घडवणारा देश, राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य, कोविंद यांनी देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला https://goo.gl/uHwZxV

7.    माझा इफेक्ट : वैद्यकीय प्रवेशासाठी परराज्यातील मुलांकडून बनावट 'डोमिसाईल', प्रवेश प्रक्रियेला स्थगिती, बनावट डोमिसाईल प्रकरणाची चौकशी होणार https://goo.gl/w3JPtP

8.    अधिकाऱ्यांवर हात उगारणाऱ्या आमदार बच्चू कडूंचा नाशिक पालिकेत जोरदार निषेध, लेखणीबंद करुन कर्मचाऱ्यांचा संताप, काळ्या फिती लावून घोषणाबाजी http://abpmajha.abplive.in/live-tv

9.    शाळा-कॉलेजमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत सक्तीचं, मद्रास हायकोर्टाचा निर्णय, आठवड्यातून किमान एकदा राष्ट्रीय गीत गाण्याचा किंवा वाजवण्याचा आदेश https://goo.gl/v2MBWD

10.    मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी, इच्छुक उमेदवारांची 200 गुणांची मराठीची लेखी परीक्षा https://goo.gl/eHbb3L

11.    मुंबईत ब्रँडेड कंपन्यांच्या नावे भेसळयुक्त दूध, सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा 800 किलो माल जप्त https://goo.gl/VkAQMv

12.    नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी 'शी बॉक्स', केंद्राचं नवं वेब पोर्टल सुरु, महिलांना वेब पोर्टलवरुन थेट तक्रार करता येणार https://goo.gl/bVu3oh

13.    कारगिल युद्धावेळी परवेज मुशर्रफ आणि नवाज शरीफ थोडक्यात बचावले, माजी एअर मार्शल ए. के. सिंह यांचा गौप्यस्फोट https://goo.gl/yjS2E9

14.    तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी ओढवणार असेल, तर ड्रायव्हरलेस गाड्यांना भारतात परवानगी देणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/nQYGUf

15.    अभिनेत्री करिष्मा कपूरच्या मुंबईतील घरी कारपेंट्रीच्या बहाण्याने घुसून चोरी, सराईत आरोपी अटकेत https://goo.gl/sCJ4aD

माझा विशेष : इमारत पडणार, माणसं मरणार, आणखी किती काळ?, विशेष चर्चा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी विलास बडे यांचा ब्लॉग, डॉ. नरेंद्र दाभोलकर जिवंत आहेत! https://goo.gl/53Vm7H

BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी विशाल बडे यांचा ब्लॉग, डेटागिरीनंतर डिजीटल फ्रीडम, जिओकडून डिजीटल इंडियाच्या क्रांतीला सुरुवात https://goo.gl/jYUP3R

BLOG : खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी... फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा खास ब्लॉग https://goo.gl/bf5zvn

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर