नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांच्यावर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपच्या महिला मोर्चाच्या दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून दिल्लीच्या मंडावली पोलीस स्थानकात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  
संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी तक्रारदार दीप्ती रावत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संतापून संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अपशब्द वापरला होता. त्यावरूनच दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. 


संजय राऊत यांनी शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती. यावर संजय राऊतांना संताप अनावर झाला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, लालकृष्ण अडवाणी जरी असते तरी मी खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृती आहे, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी टीका करणारांबाबत अपशब्द देशील वापरले होते. 


"शरद पवार यांची प्रकृती आणि त्यांना होणारा त्रास जास्त आहे. आपण बसतो तसं त्यांना खाली बसता येत नाही. म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली.  लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंह यादव, मुरली मनोहर जोशी असे नेते जरी असते तरी मी खुर्ची आणून दिली असती. हे राजकीय विरोधक जरी असले तरी ती पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत." अशा भावना राऊत  यांनी या प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना व्यक्त केल्य होत्या.  


"ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोरही उभं केलं नाही. त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नये. बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. आणि त्यांनी मला हा संस्कार दिला आहे. मोठ्यांचा आदर करावा. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. हे या ***** लोकांना कळत नाही. ही ***** बंद करा. अशानं तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. हा तुमच्या डोक्यातील कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतोय. मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्यानं जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याच अधिकार नाही. वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे." असे राऊत म्हणाले होते. परंतु, आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी अपशब्द वारले अशी तक्रार दीप्ती रावत यांनी केली आहे.


 


संजय राऊत यांचं ट्वीट




संबंधित बातम्या 


Sanjay Raut : शरद पवारांच्या जागी लालकृष्ण अडवाणी असते तरी त्यांनाही मी खुर्ची दिली असती : संजय राऊत


पवारांना खुर्ची देण्यावरुन राजकारण! संजय राऊतांना संताप अनावर, अपशब्दही वापरले