संगमनेर : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर कोर्टात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल वक्तव्य त्यांना भोवलं असून सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला होता. PCPNDT अक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
इंदोरीकर यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद राज्यभर सुरु झाला होता. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले होते. अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत आंदोलनं केली होती. यामुळं इंदोरीकर महाराजांना त्यांचे किर्तनाचे कार्यक्रम देखील रद्द करावे लागले होते. तर त्यांच्या बाजूने देखील एक गट रस्त्यावर उतरला होता.
निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले?
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांची दिलगिरी
इंदोरीकरांनी मागितली होती माफी
अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वाद टोकाला गेल्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं होतं. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असं त्यांनी म्हटलं होतं.
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले कडकडीत बंद, बाईक रॅली काढत युवकांचा इंदोरीकरांना पाठिंबा
वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2020 11:39 AM (IST)
फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेलं वक्तव्य इंदोरीकर महाराजांना (Indorikar Maharaj) भोवलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला होता. PCPNDT अक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -