मुंबई : राज्यभरात पोलिसांचे विविध कारनामे आता समोर येत आहेत. गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल 18 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सांगली पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून अनिकेत कोथळेची हत्या केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झालं आहे. यात पोलीस उपनिरीक्षकासह, ठाणे अंमलदार आणि त्याचा मदतनीसाचाही समावेश आहे.

तर वसईमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाला संशयाचं वलय निर्माण झालं असून पालघर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे हिंगोलीत बनावट नोटाप्रकरणी दोन पोलिसांना अटक कऱण्यात आली आहे. याशिवाय, पुणे पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांवर हत्येचा कट आखल्याप्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कारनाम्यांमुळे पोलिस दलाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या

वसईत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित

कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?

अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू