मुंबई : कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे.





'उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी',  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती


मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19


खाते क्रमांक- 39239591720


स्टेट बँक ऑफ इंडिया,


मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023


शाखा कोड 00300


आयएफएससी कोड SBIN0000300


दरम्यान लॉक डाऊनच्या काळात मदतीचं मोठं जाळं उभं करण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने लॉक डाऊनमुळे बाधित गोर गरीब, मजूर, ज्येष्ठ नागरिक, गरजूंना अन्न-धान्याचा पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिवसाला 51 लाखांचा टार्गेट दिला आहे. मात्र, दिवसाला किमान 20 ते 22 लाख लोकांपर्यंत मदत पोहचण्याचा राज्यातील नेत्यांचा निर्धार आहे.


संबंधित बातम्या :


Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार