मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातही सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सुविधा बंद आहेत. संचारबंदीमुळे सर्व प्रकारची खासगी आणि सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे काही लोकांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करता अडचणींना सामोरे जावं लागतं आहेत.


देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूर जिल्ह्यात ही असाच एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपल्या पत्नीसाठी चक्क घोडेस्वारी करत 70 किलोमीटरचा प्रवास केला आहे. हे घोडेस्वारी करण्याचं कारण संचारबंदीमुळे सोालापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच खासगी वाहतूक ही ठप्प झाली आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांनी पेट्रोल देण्यासही बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


अशातच सोलापूर जिल्ह्यातील दर्शनाळ गावच्या मीर अजमोद्दीन पठाण यांनी आपल्या पत्नीच्या औषधासाठी चक्क 70 किलोमीटरचा प्रवास केलाय. यात विशेष बाब अशी की त्यांनी हा प्रवास आपल्या सांभाळलेल्या घोड्यावरून केलाय. एकीकडे देशात अनेक ठिकाणी लोक पायी प्रवास करताना पाहायला मिळत आहे. तर मीर पठाण यांनी मात्र आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर चक्क घोड्यावरुन प्रवास करत आपल्या पत्नीविषयी असलेला जिव्हाळा व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता मीर अजमोद्दीन पठाण यांची पत्नी मुमताज यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. मात्र मुमताज यांची औषधे दर्शनाळ आणि अक्कलकोट शहरात उपलब्ध नसल्याने त्यांना सोलापूर शहर गाठावे लागले.


ही फरपट एवढ्यावरचं न थांबता त्यांना सोलापूर शहरातही अनेक दुकाने ही फिरावे लागली. वाहनं उपलब्ध न झालेल्या मीर पठाण यांनी घोड्यावरुन प्रवास करताना वाटेत पोलिसांनी देखील त्यांना विचारणा केली. सोबतच माणुसकीचे दर्शन घडवत त्यांना अल्पोपहारही उपलब्ध करुन दिला. तसेच योग्य त्या मेडिकलमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन ही केले. दरम्यान सकाळी 8 वाजता सुरु झालेला हा प्रवास अर्थात फरपट दुपारी 3 पर्यंत सुरुच राहिली. असे असले तरी राज्यशासनाने आणि केंद्र शासनाने ग्रामीण भागातील लोकांसाठी फिरते मेडिकल उपलब्ध करुन दिल्यास लॉकडाऊनमध्ये होणारी फरपट थांबण्यास मदत होईल.


संबंधित बातम्या:


लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी जीवघेणे प्रयोग, अनेक ठिकाणी माणसांनी भरलेली वाहनं पकडली

India Lock Down | विरारमध्ये पायी जाणाऱ्या मजुरांना टेम्पोची धडक; चौघांचा मृत्यू, तीन जखमी


संबंधित बातम्या :


Kolhapur | कोल्हापुरातील सिद्धार्थ शिंदेंचा पुढाकार, क्वॉरन्टाईन पेशंट्ससाठी दिं थ्री स्टार हॉटेल!


<