Tuljapur:साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान असणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचे काम करत असताना गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आता तुळजापुरातील पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम सुरू व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे . तुळजाभवानी मूर्तीच्या रक्षणासाठी 'एक स्वाक्षरी देवीच्या गाभारा संवर्धनासाठी ' अशी मोहीम शहरभर राबवत तब्बल 5240 स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे .आता यानंतरही गाभाऱ्याच्या बांधकामाचा निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय . (Tuljabhavani Mandir)
नक्की काय झाले? मागण्या काय?
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शेळ्यांना तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत उघड झाली होती .मंदिर गाभार्यातील फरशी व मुलांना दिलेला भाग काढून टाकल्यानंतर काही शिळा खचले आहेत तर काहींना तडे गेले आहेत .तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धन म्हणजेच जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या निग्रणीखाली सुरू असताना हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली .महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम मंदिर संस्थांच्या 65 कोटी रुपयांच्या स्वनिधीतून सुरू आहे .असे असताना हा प्रकार घडल्याने मंदिर प्रशासनाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी होत आहे .यासाठी पुजारी मंडळाकडून 5240 स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे .
पुजारी मंडळाकडून आंदोलनाचा इशारा
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर तुळजापुरातील पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी होत आहे .तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीच्या गाभारा संवर्धनासाठी ..अशी मोहीम पुजारी मंडळांनी शहरभर राबवत तब्बल 5240 स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे .देवीच्या गाभाऱ्या संवर्धनासाठी गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .निवेदन देऊनही गाभाऱ्याचा बांधकामाचा निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .
तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे सहा टप्पे पूर्ण झाल्या असून पहिल्या भागात भुयारी मार्ग यज्ञ मंडप सभा मंडप व भवानी शंकर मंदिर जतन वर दुरुस्ती हे 11 कोटी 36 लाखांचे काम करण्यात आले .दुसऱ्या टप्प्यात कार्यालयीन प्रशासकीय इमारत , पोलीस चौकी , प्रेक्षक मंच , गोमुक्तीर्थ , दत्त मंदिर ,मातंगी मंदिर कल्लोळतीर्थ मार्तंड ऋषि मंदिर टोळभैरव मंदिर शिवाजी महाद्वार व ओव्या इत्यादी मंदिरांचे जतन व दुरुस्ती करण्यात आली .
हेही वाचा: