Maharashtra Corona Update : कोरोना महामारी (Corona) अजूनही संपूर्णपणे संपली नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात असतं. दरम्यान कोरोनाबाधित अजूनही आढळत असून 24 तासांत राज्यभरात 198 नवी रुग्ण आढळले आहेत. तसंच एका कोरोनाबाधिताचा मृत्यू देखील झाला आहे. सर्वाधिक 80 रुग्ण मुंबईत आढळले असून याशिवाय 328 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. 328 कोरोनामुक्त झाल्यानंतर आजवर एकूण 79,72,580 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.94% एवढे झाले आहे.


आज राज्यात आढळलेल्या 198 नवीन कोरोनारुग्णांमुळे राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 2523 इतकी झाली आहे. तसंच आज एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82% इतका झाला आहे. मागील 24 तासांत तपासण्यात आलेल्या 8,48,96,526 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,23,453 (9.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


देशांत आढळले 2529 नवे कोरोनाबाधित


संपूर्ण देशाचा विचार करता मागील 24 तासांत कोरोनाच्या 2529 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारच्या दैनंदिन रुग्णांच्या आकडेवारीनंतर देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा 4,46,04,463 वर पोहोचला आहे. तर, सध्या कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 32,282 इतकी आहे. कोरोनाबाधितांचा कालचा आकडा आणि आजच्या आकड्याची तुलना केली तर गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 1,036 ने घट झाली आहे.


भारताचं वर्ल्ड बँकेकडून कौतुक


कोरोना महामारीच्या काळात गरीब देशांसाठी भारतानं केलेलं काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असं म्हणत वर्ल्ड बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेविड मालपास यांनी भारताचं जागतिक मंचावर कौतुक केलं आहे. ते म्हणाले की,महामारीच्या भयावह संकटामध्ये भारताने गरीब आणि गरजू लोकांसाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे. यासोबतच मालपास यांनी भारताने दिलेल्या रख हस्तांतरणावरही भाष्य केले. इतर देशांनी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली. पण भारताने रोख हस्तांतरणावर लक्ष केंद्रित केलं, असंही ते म्हणाले.


हे ही वाचा :


वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, जागतिक बँकेकडून कौतुक