कोपर्डी प्रकरण : साक्षीदारांमध्ये उज्ज्वल निकमांचा समावेश करण्यास कोर्टाचा नकार
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2017 01:44 PM (IST)
अहमदनगर : कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांचा अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. खोपडे यांनी बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांची नावं दिली होती. बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्षही घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज वकील बाळासाहेब खोपडे यांनी केला होता. तो अर्ज अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या या आदेशावर आम्ही हायकोर्टात अर्ज करणार असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यावर कोर्टाने 24 जुलैपर्यंतची मुदत दिली असून, येत्या 24 तारखेला याबाबत हायकोर्टात केलेल्या अपीलाची काय स्थिती आहे, हे म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे.