औरंगाबाद : ‘यापुढे नारेगावात कचरा टाकू नये.’ असा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने नारेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या 22 दिवसांपासून नारेगावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे औरंगाबादेत अभूतपूर्व कचराकोंडी झाली आहे. याचप्रकरणी नारेगावमधील नागरिकांनी याचिकाही दाखल केली होती. त्याच याचिकेवर आज खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. याच निर्णयाबरोबर कोर्टाने पालिकेलाही इतर १० सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं होतं. मिटमिटा आणि पडेगावात कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्यांची स्थानिकांनी तोडफोड केली आणि त्या पेटवून दिल्या होत्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या होत्या.
औरंगाबाद शहरातील कचरा आधी नारेगावच्या डेपोत टाकला जायचा, मात्र नारेगावच्या ग्रामस्थांनी याला विरोध करत कचरा टाकू देण्यास विरोध केला. त्यानंतर अद्याप औरंगाबाद महापालिकेला दुसरी पर्यायी जागा शोधण्यात यश आलेलं नाही. पण यावर तात्पुरता तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी खदानी भागात कचरा टाकण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
पोलिसांकडूनच नागरिकांवर दगडफेक, शिवसेना आमदाराचे गंभीर आरोप
औरंगाबाद कचरा प्रश्न : आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण, ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा
डम्पिंग ग्राऊंडसाठी जमीन देणार नाही: मुख्यमंत्री
18व्या दिवशीही औरंगाबादमधील कचराकोंडी कायम
औरंगाबादेतील कचराकोंडीचा 17 वा दिवस, आमदार सावेंची गाडी अडवली
औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली
कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड