औरंगाबाद : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील कारवाई टाळण्यासाठी जालन्यातील उपविभागीय अधिकारीला 3 लाखांची लाच घेताना औरंगाबांद लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे.


जालन्यातील अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी 3 लाखांची लाच मागितली होती. काल औरंगाबाद लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सविता चौधर यांना रंगेहाथ अटक केली आहे.

दरम्यान सविता चौधर यांच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्या घरातून 2 लाख 10 हजार रुपयांची रोकड तसेच अर्धा किलो सोनं आणि 4 फ्लॅटचे कागदपत्रंही आढळून आहेत आहेत.

यानंतर सविता चौधर यांना अटक करण्यात आली असून, लाचलूचपत विभागाने त्यांना जालना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.