अकोला: पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या नोटा कुठे कचऱ्यात तर कुठे गंगेमध्ये आढळत आहेत. पण अकोल्यामध्ये आज 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा जळालेल्या अवस्थेत सापडल्या.
शहरातील गोरक्षण भागामधील एका गल्लीत 1000 आणि 500च्या जुन्या नोटा जळालेल्या अवस्थेत असल्याचे दृश्य दुपारी कचरा गोळा करणाऱ्या महिलेला दिसले. तर याच गल्लीत आखणी दोन ठिकाणी अशाच प्रकारे जुन्या नोटांना जाळून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. काही लोकांनी अर्धवट जळालेल्या नोटांवर डल्ला मारल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
एकूण 3 ठिकाणी जाळण्यात आलेल्या या नोटांचा नेमका आकडा कळू शकला नाही. मात्र, ही रक्कम 20 लाखांवर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.