वर्ध्यात प्रेमी युगुलाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2017 06:24 PM (IST)
वर्धा : वर्ध्यात एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केली आहे. समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडीमध्ये आज एका घरात प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आले. आत्महत्या केलेल्या जोडप्यातील मुलीचं लग्न झालेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याच बोललं जातं आहे. आत्महत्या केलेल्या या मुलीचं दुसऱ्याच इसमाशी पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र प्रियकरासोबत अजूनही तिचे प्रेमसंबंध सुरु होते. महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या केलेली तरुणी गर्भवती होती. काल दवाखान्यात जाते अस सांगून बाहेर ती घराबाहेर पडली, मात्र उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रेमी युगुलातील या मुलीने विष प्राषन करुन आत्महत्या केली, तर मुलाने गळफास घेतल्याची माहिती आहे. दोघांचेही मृतदेह ज्या घरात सापडले त्याच घरात पोलिसांना बेडवर फुलं, कोल्ड्रिंक बॉटल आणि केकसुद्धा आढळून आला.