कोल्हापूरच्या प्रेमी युगुलाचं साताऱ्यात विष प्राशन, तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 20 May 2016 10:02 AM (IST)
सातारा : कुटुंबीयांना लग्नाला विरोध केल्याने प्रेमी युगुलाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. साताऱ्यातील चाफळजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणी बेशुद्ध असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे प्रेमी युगुल मुळचं कोल्हापूरच्या शिये गावातील आहे. आम्ही कोल्हापूरहून साताऱ्याला पळून आलो आहोत. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने आत्महत्या करत असल्याची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. दरम्यान, उंब्रज पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.